उद्या 'या' वयोगटातील नागरिकांना मिळणार लस
महापालिकेचा निर्णय
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उद्या (मंगळवार) पासून ४५ वर्षाच्या पुढील लोकांना लस देण्यात येणार आहे.
ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे, अशांना लसीचा पहिला डोस दिला जाईल व लसीचा दुसरा डोस ऑफलाइन पद्धतीने देण्यात येईल. त्यामुळे महानगरपालिकेच्या १९ केंद्रावर ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ज्यावेळी लस उपलब्ध होईल त्यावेळी कळविण्यात येईल. त्यावेळी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून लस घ्यावी असेही सोलापूर महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.