ऐकायला कमी येतंय ? आता चिंताच नको !
नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकमध्ये अत्याधुनिक उपचार
औद्योगिक क्रांतीनंतर जग अधिक जवळ येत गेले. या क्रांतीमुळे सुविधांबरोबरच मनुष्याच्या दैनंदिन गतीतही मोठी वाढ झाली. या धकाधकीच्या जीवनातील वाढत्या गतीचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर होत आहे. यातून अनेक गंभीर समस्याही निर्माण झाल्या आहेत. कर्णबधिरता, बहिरेपणा ही त्यातीलच एक समस्या. पण सोलापूरसारख्या तुलनेने लहान असलेल्या शहरांतही अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कर्णबधिरतेवर, बहिरेपणावर होणारे उपचार हे नक्कीच आशादायक आहे.
गेल्या दोन दशकांपासून कर्णबधिरता, बहिरेपणा या समस्या समजात अनेकांना डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. दैनंदिन जीवनातील ही मोठी समस्या असली तरी यावर असलेले उपचार घेण्यास पूर्वी संबंधित व्यक्ती तयार नसे. ऐकायला कमी येण्यातून समाजात वावरताना निर्माण होणारा न्यूनगंड हे त्यामागील मुख्य कारण असे. कानावर यंत्र लावल्याने लोक काय म्हणतील असा विचार त्या व्यक्तीला सतावत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ऐकायला कमी येणारे लोक श्रवणयंत्र बसविण्यासाठी, स्पीच थेरपी घेण्यासाठी पुढे येत आहेत ही बाब सकारात्मक आहे.
पूर्वी ऐकण्याच्या समस्येवर उपायासाठी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्यावाचून गत्यंतर नसायचे. मात्र सोलापूरातच अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत मोठ्या शहरांकडे जाणारे रुग्ण सोलापूरातच स्थिरावले आहेत.
कर्णबधिरता, बहिरेपणा यांवर उपाय म्हणजे नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक हे समीकरण सोलापूरसह लातूर, विजयपूर, उस्मानाबाद, कलबुर्गी येथे तयार झाले आहे.
प्रख्यात ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले यांनी सोलापूर आणि परिसरातील जिल्ह्यातील कर्णबधिर व्यक्तींवर केलेल्या यशस्वी उपचारांमुळे रुग्णांत निर्माण झालेला आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर आलेले हसू हेच नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकचे यश आहे असे, ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले नेहमी सांगतात.
नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत सिग्निया क्लिनिक (पूर्वीचे सिमेन्स) दत्त चौकात सुरू झाले आहे. समर्थ रामदास संकुलातील पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या या सिग्निया क्लिनिकच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून बनविलेली यंत्रे कर्णबधिरता, बहिरेपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
श्रवणयंत्रे, क्लॉक्लियर इंप्लांट, बाह्य इंप्लांट याबरोबरच श्रवण क्षमता व चक्कर संबंधित तपासण्या असलेल्या ऑडीओमेट्री, इंपेडन्स, बि. ओ. ए., ओ.ए.ई., बेरा (एसी, बीसी, टीबी, एचआर), सि.ए.पी.डी., स्पीच व एडेड ऑडिओमेट्री, टीन्नीटस, वेम्प अशा चाचण्या नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक येथे केल्या जातात. याशिवाय उशिरा/तोतरे/अडखळत बोलणे, आवाजाचे दोष, लर्निंग डिसॅबिलिटी, ऑटिझम, चंचलपणा, गतिमंदपणा, लकवा, बहिरेपणा यांवर आवश्यक असलेली स्पीच थेरपी ISO 9001 : 2015 प्रमाणित असलेल्या नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकमध्ये दिली जाते.
आपले मूल नीट ऐकू शकत नाही हे अनेकदा पालकांना लवकर लक्षात येत नाही. काही महिन्यांनी ही बाब जाणवली की त्या पालकांवर जणू आभाळ कोसळते. ऐकू येत नसल्यामुळे साहजिकच अनेक बालकांना नीट बोलताही येत नाही. याचा थेट परिणाम त्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर आणि आपसूकच त्यांच्या जीवनावर होतो. मात्र वेळीच तपासणी आणि उपचार करून घेतले तर पुढील काळात होणारा त्रास वाचतो हे हजारो रुग्णांचे अनुभवच बोलतात.
ही समस्या जशी लहान मुलांमध्ये आहे, तशी ती सर्वच वयोगटांतील लोकांमध्ये कधीही लक्षात येऊ शकते. ऐकू कमी येणे, बहिरेपणा जाणवणे यांमुळे समाजात वावरताना संबंधित व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. वेगळेपणाची भावना अशा लोकांमध्ये येऊ लागते. चारचौघांत बोलताना आपण कमी आहोत असे त्यांना वाटू लागते.
पूर्वी अशी समस्या असेल तर श्रवणयंत्र बसविणे हे कमीपणाचे वाटत असे. मात्र आता कमी ऐकू येत आहे हे लक्षात येताच त्वरित श्रवणयंत्र बसविण्याकडे कल वाढत आहे, असे ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले सांगतात.
----------------------
ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले यांच्याबद्दल थोडेसे.....
ऑडिओलॉजिस्ट रविशंकर राजशेखर नवले हे नामवंत कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट व स्पीचथेरपिस्ट आहेत. हरिभाई देवकरण प्रशालेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्समधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
स्पीच व हिअरिंग या क्षेत्रात मुंबई येथील अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हॅन्डीकॅप येथून त्यांनी २००५ साली पदवी मिळवली. मुंबई येथील नायर रुग्णालयात त्यांनी याच विषयात पदव्युत्तर शिक्षण २००८ साली पूर्ण केले. ही पदवी पूर्ण करणारे ते सोलापूर जिल्ह्यातील पहिले व्यक्ती ठरले.
उच्च शिक्षण घेतल्यानंतर २००८ साली त्यांनी सोलापूर येथे “नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक” ची सुरुवात केली. तेंव्हापासून आतापर्यंत सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील वाचा व श्रवण दोषांसंबंधित सर्व सुविधा पुरविणारे हे एकमेव अधिकृत क्लिनिक आहे.
या व्यतिरिक्त ते सोलापूर व परिसरातील ३ नामांकित हॉस्पिटल (अश्विनी सहकारी रुग्णालय, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व अश्विनी रुरल रुग्णालय - कुंभारी.) मध्ये कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट म्हणून काम पाहतात. ते रीहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) च्या श्रवण प्रशिक्षण ट्रेनिंग प्रोग्रामसाठी परीक्षक म्हणून देखील काम पाहतात. त्यांच्या नावावर २ नॅशनल व १ इंटरनॅशनल रिसर्च पेपरसुद्धा प्रकाशित असून अनेक लेख विविध वृत्तपत्रे व मासिकांमध्ये प्रकाशित आहेत.
ते बारामती येथे २००९ पासून कोठारी क्लिनिक मध्ये, लातूर मध्ये २०१३ पासून व मिरज येथे २०१६ आपल्या सुविधा प्रदान करीत आहेत.
डिसेंबर २०१४ मध्ये सांगली येथे पार पडलेल्या ४६ व्या महाराष्ट्र ई.एन.टी. कॉन्फरन्स मध्ये पार पडलेल्या पहिल्या ऑडिओलॉजिस्ट फोरमचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. हा सन्मान मिळालेले ते महाराष्ट्रातील पहिले ऑडिओलॉजिस्ट आहेत.
त्यांच्या क्लिनिकला ISO 9001 : 2015 हे standardization मधले सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. हे क्लिनिक आता या क्षेत्रातील ISO 9001 : 2015 मानांकन प्राप्त असलेले महाराष्ट्रातल्या मोजक्याच क्लिनिक / हॉस्पिटल पैकी आहे.
सप्टेंबर २०१६ ला पार पडलेल्या “वेस्टीब्युलर असेसमेंट” या विषयावर झालेल्या कार्यशाळेत त्यांनी सहभाग घेतला असून त्यांचे क्लिनिक, हे कानासंबंधित असणाऱ्या चक्कर विषयी निदान व उपचार करणाऱ्या भारतातील मोजक्या क्लिनिकपैकी एक आहे.
-------------------
अनुभवाचे बोल.....
माझी मुलगी नऊ महिन्यांची असताना आम्हाला जेंव्हा कळले कि तिला ऐकू येत नाही, तेंव्हा आमच्या पायाखालची वाळूच सरकली. ती ९५ डेसिबल पर्यंतच्या कोणत्याच आवाजाला प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर तिला कॉक्लिअर इंप्लांटचे उपचार केले. श्रवणयंत्र बसविल्यानंतर ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले सरांनी दिलेल्या स्पीच थेरपीमुळे माझी मुलगी हळूहळू बोलायला लागली आहे. स्पीच थेरपी देण्याची वेळ आली तेंव्हा आम्ही अर्थातच नवले सरांनाच प्राधान्य दिले. त्यांच्या उपचाराचे कौतुक करावे तितके कमी आहे.
---- मुजफ्फर बागलकोटे (अडीच वर्षांच्या रुग्ण मुलीचे वडील)
---------
सूक्ष्म आवाज येत नाही अशी माझ्या मुलाची समस्या होती. तो आठवीत होता तेंव्हा त्याला याची प्रकर्षाने जाणीव झाली. यानंतर आम्ही मनात कोणताही किंतु परंतु न बाळगता ऑडिओलॉजिस्ट नवले सरांना भेटलो. त्यांनी लावलेल्या श्रवणयंत्रामुळे त्याला आता चांगले ऐकू येत आहे.
---- मोहन गणपा (श्रवण यंत्र बसविलेल्या मुलाचे वडील)
---------
ऐकू न येणाऱ्यांसाठी स्पीच थेरपी हा उत्तम उपाय आहे. माझी मुलगी दोन वर्षांची असताना आम्हाला कळाले कि तिला ऐकू येत नाही. ९५ डेसिबलपर्यंतचा आवाज तिला ऐकू येत नव्हता. ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले यांनी दिलेल्या स्पीच थेरपीमुळे आणि श्रवण यंत्रामुळे तिची प्रगती खूपच चांगली आहे. ती आता अक्षरे ओळखू लागली आहे. लिहण्याचीदेखील प्रगती चांगली आहे. नवले सरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही उपचार घेत आहोत.
--- तृप्ती फुंडीपल्ले (६ वर्षांच्या मुलीची आई)
----------
मी ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले सरांचा कायम आभारी राहीन. मी माझ्या मुलाला नीट ऐकू येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी उपचार केले. अनेक यंत्रे घेतली पण गुण येत नव्हता. चांगल्या दर्जाची श्रवण यंत्रे नवले सरांनी दिल्यामुळे माझ्या मुलासारख्या अनेक जणांना खूप फायदा झाला आहे. अत्याधुनिक यंत्राद्वारे उपचार केल्यामुळे रुग्णांचा फायदा होतो.
---- प्रकाश रेड्डी, लातूर (१७ वर्षीय मुलाचे वडील)
---------------
मला खूपच कमी ऐकू येत होते. नवले सरांनी आयोजित केलेल्या शिबिरात मी हजेरी लावली. नवले सरांनी दिलेल्या श्रवण यंत्रामुळे आता मला चांगले ऐकू येत आहे.
----- पुष्पादेवी गुप्ता, सोलापूर (७० वर्षीय जेष्ठ नागरिक)