डी मार्ट मध्ये बॉम्ब मिळाल्याचा फोन आला अन.....

अवघ्या चार मिनिटात पोहचले पोलिस

डी मार्ट मध्ये बॉम्ब मिळाल्याचा फोन आला अन.....

सोलापूर : प्रतिनिधी

वार मंगळवार वेळ सकाळी १० च्या सुमारास..... पोलिसांना फोन आला की जुळे सोलापूरातील डी मार्ट मध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. तात्काळ पोहचा......

निरोप मिळता क्षणीच सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली. पोलिस, अधिकारी, कर्मचारी, बॉम्ब शोधक पथक, रुग्णवाहिका, श्वान पथक अशा सगळ्याच यंत्रणांची एकच धावपळ उडाली. सर्वांचे लक्ष्य एकच होते...बॉम्ब निकामी करणे. अवघ्या ४ मिनिटात पोलिस दाखल झाले...पोलिसांनी तपासणी केली.....संशयिताला ताब्यात घेतले आणि जागेवर चौकशी केली.....तोपर्यंत डी मार्ट मध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची भीतीने भंबेरी उडाली होती. आजूबाजूला सुरू असलेली पोलिसांची धावपळ, बॉम्बशोधक पथकाची धावपळ, संशयिताची सुरू असलेली चौकशी हे पाहून ग्राहक पुरते घाबरून गेले होते. कोणत्याही क्षणी बॉम्ब फुटतो की काय अशी भीती नागरिकांना वाटत असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहीर केले ही 'मॉक ड्रिल' आहे, कोणीही घाबरण्याचे कारण नाही. हे ऐकताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सुरक्षा शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, रवी बुरकुले, एटीएसचे ए एस आय शेख यांच्या पथकाने केली.
---------------
पोलिसांचे कौतुक
निरोप मिळता क्षणीच कामाला लागून अवघ्या ४ मिनिटात जागेवर पोहचणाऱ्या पोलिसांचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी डी मार्टचे व्यवस्थापक सचिन हडप आणि कर्मचारी वर्गानेही सहकार्य केले.