राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदी अखेर 'यांची' नियुक्ती !

तीन दिवसांच्या राजकीय खलबतानंतर प्रदेश समितीचा झाला निर्णय

राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदी अखेर 'यांची' नियुक्ती !

सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर अखेर शरद पवारच कायम राहतील असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य समितीने शुक्रवारी केला. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या सदस्य समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला.

पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर पक्षात एकच खळबळ माजली होती. यानंतर दोन दिवसांनी अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे श्री पवार यांनी सांगितले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समितीची बैठक शुक्रवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीस अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ अभिनेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी खा. सुप्रिया सुळे यांची निवड होणार की माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्णी लागणार ? यावर गेले दोन दिवस राज्यभर चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार हेच कायम राहतील अशीही शक्यता वर्तवली जात होती. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते मंडळींनी ही शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम रहावे असा आग्रह त्यांच्याकडे धरला होता. शुक्रवारी अखेर शरद पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाले.

पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यभरात यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.