मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

श्री साई महिला प्रतिष्ठान आणि इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे आयोजन

मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी

श्री साई महिला प्रतिष्ठान आणि इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूलतर्फे आयोजित मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात हिमोग्लोबिन, थायरॉईड, शुगर, लिव्हर फंक्शनिंग आदी तपासण्या करण्यात आल्या. जुळे सोलापूर परिसरातील १७० महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. सोलापूर महानगरपालिकेच्या सोरेगाव येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संस्कृती वळसंगकर, गुरुप्रसाद इनामदार तसेच कर्मचाऱ्यांचे सहकार्य या शिबिरास लाभले.

"श्री साई महिला प्रतिष्ठान महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर असते. महिला सक्षमीकरण बरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे हेतूने हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले", असे श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी यांनी सांगितले.
----------------------
६ ऑगस्ट रोजी पुन्हा होणार शिबिर
जुळे सोलापूर महिला आणि इंडियन मॉडेल स्कूलच्या महिला पालकांच्या आग्रहास्तव महिला आरोग्य मोफत तपासणी शिबिर शनिवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ ते १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी यांनी केले आहे.