फेसशिल्डसह उपयुक्त वस्तूंचे आ. शिंदे यांच्या हस्ते वाटप

काँग्रेस सुशिक्षित बेरोजगार सेलचा उपक्रम

फेसशिल्डसह उपयुक्त वस्तूंचे आ. शिंदे यांच्या हस्ते वाटप

सोलापूर : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाच्या सुशिक्षित बेरोजगार सेलमार्फत गरजू नागरिकांना फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर वाटप अशा उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते हे वाटप झाले.

कोरोना महामारी काळात नागरिकांना स्वतः चे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करणे सोपे  व्हावे यासाठी हा उपक्रम काँग्रेस पक्षाच्या सुशिक्षित बेरोजगार सेलमार्फत राबविण्यात आला.

वालचंद महाविद्यालयाजवळील पंचमुखी हनुमान मंदिर येथे वाटपाचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुशिक्षित बेरोजगार सेलचे संयोजक रुपेशकुमार गायकवाड होते. यावेळी सेलचे संयोजक रुपेश गायकवाड म्हणाले, सोलापूर शहरात एकूण पाच हजार मास्क व पाच हजार सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच फ्रंटलाईन वर्कर, पोलीस सफाई कामगार व सामाजिक कार्यकर्ते यांना ५०० शिल्ड वाटप करण्यात येणार आहे.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सेलने आवश्यकतेनुसार कोरोना काळात पूर्वीही काम केले आहे व आगामी काळातही तुमच्या मी बरोबरच आहे. आगामी काळात सेलने सक्रीय राहून जनतेला व सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींना सर्व प्रकारची मदत करावी. अशा उपक्रमांना माझा संपूर्ण पाठिंबा असेल असेही आमदार शिंदे म्हणाल्या.

सेलचे संयोजक रुपेश गायकवाड यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन अतुल शिरसट यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शिंदे, अमीर शेख, आकाश किंगी, जय हुलाबल्ली, चेतन दांडी, रोहन पेंडकर, मुकुंद मानकर तसेच सेलच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.