महेश धाराशिवकर यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक असेपर्यंत 'मातोश्री' ची घोडदौड राहणार कायम
पुरूषोत्तम बरडे : शिवसेनेतर्फे नूतन शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांचा पक्षातर्फे सत्कार
सोलापूर : प्रतिनिधी
निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच शिवसेनेची आजवर प्रगती झाली. महेश धाराशिवकर यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक असेपर्यंत 'मातोश्री' ची घोडदौड कायम राहणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेतर्फे महेश धाराशिवकर यांचा गुरुवारी तुळजापूर वेस येथील दैवज्ञ समाज मंगल कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना महानगरप्रमुख विष्णू कारमपुरी, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमनी, काँग्रेसचे प्रा. अशोक निंबर्गी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, मनसे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, भाजपचे चन्नवीर चिट्टे, सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष सिद्धाराम शिंगारे, वसंत पोतदार प्राचार्य राजेंद्र लोखंडे, दैवज्ञ समाज अध्यक्ष पांडुरंग वेर्णेकर, भाजपाचे शशी थोरात, शिवसेनेचे अरुण लोणारी, वसतिगृह आश्रम शाळेचे अध्यक्ष महेश सरवदे, शिवसेनेचे शहर उत्तरचे समन्वयक बाळासाहेब गायकवाड, ॲड. बसवराज सलगर, संजय कंदले उपस्थित होते.
यावेळी नूतन शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री बरडे म्हणाले, महेश धाराशिवकर यांनी आजवर पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले आहे. शिवसेनेची गद्दारी करून अनेक नेते गेले तरीही महेश धाराशिवकर यांच्यासारखे प्रामाणिक शिवसैनिक आजही पक्षात कार्यरत आहेत. हेच शिवसेनेचे बळ आणि खरी संपत्ती आहे.
प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले, महेश धाराशिवकर आणि शिवसैनिक पक्ष संकटात असताना पक्षाची खिंड लढवत आहेत. सोलापुरातील हिंदुत्व महेश धाराशिवकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे टिकून आहे. शहर उत्तर विधानसभा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. हिंदुत्वासाठी अनेक शिवसैनिकांनी लाठ्या खाल्ल्या असेही प्रा. निंबर्गी म्हणाले.
महेश धाराशिवकर म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेनेचे कार्य सुरू केले. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हा मूलमंत्र घेऊन समाजाची सेवा करण्याच्या प्रयत्न केला. त्याचे फळ म्हणून पक्षाने शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. आगामी काळातही पक्षाच्या आणि जनतेच्या सेवेसाठी अखंड कार्यरत राहणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला बहुमत मिळवून देणे हेच ध्येय असणार आहे, असेही नूतन शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी सांगितले.
अभिजीत भडंगे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सोमशंकर कंठीमठ, राहुल वांगी, तुकाराम शिवशेट्टी, निखिल महामुनी, अभिषेक रंपूरे, योगेश कंठीमठ, लक्ष्मीकांत व्हनमाने, आसिफ मुल्ला, सोमनाथ गवळी आदी उपस्थित होते.