सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी ? वाचा ?
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील यांचा सोलापूर जिल्ह्याशी असलेला संपर्क पाहता लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक आगामी काळात असताना झालेली ही निवड सूचक मानली जात आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर सोलापूरचे पालकमंत्रीपद असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ती जबाबदारी बदलून अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार