ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस ? वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
ललित पाटील प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत माहिती दिली. हिवाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेवेळी त्यांनी माहिती सादर केली. त्याबाबत त्यांनी ट्विटदेखील केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अँटीनार्कोटिक्स टास्कफोर्स (ANTF) राज्यात स्थापन करण्यात आला आहे. राज्यात बंद कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करतो आहोत. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
ललित पाटील प्रकरणात ४ पोलिस बडतर्फ करण्यात आले आहेत.
ललित पाटीलला प्रथम अटक झाली, तेव्हा त्याची पोलिस कोठडीच घेतली नाही. त्यामुळे कृष्णप्रकाश यांनी एप्रिल २०२१ मध्ये हायकोर्टात जाण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली, पण तत्कालिन राज्य सरकारने ती दिलीच नाही. ललित हा उबाठा गटाचा शाखाप्रमुख होता. पण मी याला कधीच राजकीय रंग दिला नाही, कारण अशा प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.
व्यसनमुक्तीसाठी मोठी यंत्रणा उभारण्याचे काम सुद्धा सोबतच हाती घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.