सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे

उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी : नूतन पदाधिकाऱ्यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने ही निवड झाली. सुनील पेंडसे यांच्या अध्यक्षपदासाठी संचालक पुरुषोत्तम उडता यांनी सूचना मांडली तर संचालक ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी त्यास अनुमोदन दिले. तसेच ॲड. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपाध्यक्षपदासाठी संचालक आनंद कुलकर्णी यांनी सूचना मांडली तर त्यास संचालक राजेश पवार यांनी अनुमोदन दिले.

बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले, अडचणीच्या काळानंतर सोलापूर जनता सहकारी बँकेने आता घोडदौड सुरू केली आहे. यंदा झालेल्या १३ कोटींच्या नफ्यात आणखी भरीव वाढ करुन पुढील वर्षात सोलापूर जनता सहकारी बँक मोठ्या प्रमाणात नफा कमावेल यासाठी प्रयत्नशील राहू.

उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी म्हणाले, बँकेचे ग्राहक, कर्जदार, सभासद यांच्या सर्वांगीण फायद्यासाठी बँकेतर्फे नवनवीन योजनांच्या आखण्यात येणार आहेत.

याप्रसंगी नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, आनंदराव कुलकर्णी, प्राचार्य गजानन धरणे, वरदराज बंग व मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सोलापूर जनता सहकारी बँकेचे मावळते अध्यक्ष वरदराज बंग,  संचालक प्राचार्य गजानन धरणे, ऍड. प्रदीपसिंह राजपूत, पुरुषोत्तम उडता, चंद्रिका चौहान, जगदीश भुतडा, सी.ए. गिरीश बोरगांवकर, आनंद कुलकर्णी, राजेश पवार, मुकुंद कुलकर्णी, विनोद कुचेरीया, रवींद्र साळे, दत्तात्रय कुलकर्णी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी,  सोलापूर जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील विभाग प्रमुख उपस्थित होते.