बिग ब्रेकिंग ! विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा

' या ' दिवशी होणार विधानसभेसाठी मतदान : निवडणूक आयोगाची माहिती

बिग ब्रेकिंग ! विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकीची घोषणा मंगळवारी दुपारी भारतीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता आता संपूर्ण महाराष्ट्रभरात लागू झाली आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. ३० ऑक्टोबर रोजी दाखल अर्जांची छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत असून २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार ? याचे उत्तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकालाने मिळणार आहे.