रस्त्यावरील ५०० गरजूंना दिल्या चपला
स्वराज संस्थेचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
वाढत्या उन्हामुळे चप्पल नसलेल्या गरजूंना चप्पल, बूट देण्याचा उपक्रम स्वराज संस्थेने राबविला. शहरातील ५०० हून अधिक गरजूंना चप्पल, बूट देण्यात आले.
ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो त्याप्रमाणे समाजातील गरजू व्यक्तींचीही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे संस्थेच्या संस्थापिका स्वराली भोसले यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रितू माळगे, कस्तुरी महाजन, आदिल जमादार, अर्णव कुलकर्णी, ज्योत्स्ना सगर, कोमल मोरे, आर्या इंगळे, मंगेश सोनकांबळे, अंकित जेऊरे, सारंग कुलकर्णी, ओंकार खासणीस, अजय मद्धली, झुबैर शाब्दी, रोहित उबाळे, आकाश भूमकर, मयूर बनसोडे, श्रीनिधी भोसले, विराज गवळी, लावण्या मिठ्ठा यांनी परिश्रम घेतले.