भारतीय जनता युवा मोर्चाची बहुप्रतिक्षित कार्यकारणी जाहीर !
कोणाकोणाला मिळाली पदे ? वाचा ! : डॉ. किरण देशमुख यांनी केली घोषणा
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहराच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर कार्यकारिणीची घोषणा भाजपचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांनी केली.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर कार्यकारिणीवर अनेक जणांची नावे चर्चिली जात होती. भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर कार्यकारिणीची घोषणा कधी होणार याबाबत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता होती. अखेर गुरुवारी भाजपचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांनीही कार्यकारिणी जाहीर केली आहे.