सोलापूरात राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक
भाजयुमो व ओबीसी मोर्चातर्फे प्रतिमेला जोडे मारत केला निषेध
सोलापूर : प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे नसून, तेली समाजात जन्मलेले तेली नसतात अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी सोलापुरातील कन्ना चौक येथे भाजयुमो व भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने म्हणाले, काँग्रेस नेहमीच ओबीसीविरोधी राहिली आहे. देशाचा प्रधानमंत्री सामान्य तेली समाजातून झालेले काँग्रेसला पहावत नसल्याने राहुल गांधींनी अशा पद्धतीने ओबीसी विरोधी सूर त्यांच्या आजच्या भाषणातून दाखवला आहे. ओबीसी समाज नक्कीच या वक्तव्याची परतफेड येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत करेल. २०१९ साली लोकसभेत ४४ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत ४ जागा देखील मिळणार नाहीत, असेही प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने म्हणाले.
भारतीय जनता ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य यतीराज होनमाने
म्हणाले, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजाचे असलेले रुचत नसल्याने त्यांनी अशा पद्धतीची गरळओक त्यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रवीण कांबळे यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करताना राहुल गांधींना व काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, संजय साळुंखे, सागर अतनुरे, नागेश पासकंटी, नागेश गंजी, प्रवीण कांबळे, ओंकार होमकर, अर्जुन मोहिते, नरेश ताटी, रोहन मराठे, भारतीय जनता युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.