ललिता पंचमीनिमित्त दाधिच समाजातर्फे कमलपुष्प अर्चना
चेन्नईवरून आणली २१०० कमळाची फुले
सोलापूर : प्रतिनिधी
ललिता पंचमीनिमित्त सोलापूर दाधिच (दायमा) समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे रविवारी कमलपुष्प अर्चना करण्यात आली. चाटी गल्ली येथील गायत्री भवनमध्ये हा कार्यक्रम झाला.
गेल्या १८ वर्षांपासून हा कार्यक्रम नवरात्रीतील ललिता पंचमीनिमित्त करण्यात येतो. लक्ष्मीदेवीला कमळाची फुले प्रिय असल्याने तब्बल दोन हजार १०० कमळाच्या फुलांची सजावट करण्यात आली. यासाठी खास चेन्नईवरून ही फुले आणण्यात आली होती.
पुष्कर व्यास, ओमप्रकाश पेडवाळ यांनी पौरोहित्य केले. यावेळी अध्यक्ष श्रीनिवास दायमा, मंत्री विजय दायमा, युवा संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर दायमा, मंत्री कृष्णकांत दायमा, महिला अध्यक्षा मंगला दायमा, मंत्री सपना दायमा, महाराष्ट्र दाधिच युवा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल दायमा, आशिष दायमा, गोपाल दायमा, गोपाल पल्लोड, संजीव व्यास, संतोष दायमा, शुभम दायमा आदी उपस्थित होते.