अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर करा कारवाई

भाजयुमोचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर करा कारवाई

सोलापूर : प्रतिनिधी

जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना झालेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाकडून करण्यात आली. याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत भाजयुमो सोलापूर शहराच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. त्यात भाजयुमोच्या कार्यकर्त्यावर अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा आज निषेध व्यक्त करत भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य समर्थ बंडे, सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, महेश पाटील, प्रवीण गलांडे आदी उपस्थित होते.