संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचे सोलापूरकरांना होणार दर्शन !
अखिल भाविक वारकरी मंडळाकडून होणार रिंगण सोहळा
सोलापूर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचे दर्शन सोलापूरकरच्या शहवासीयांना होणार आहे. अखिल भाविक वारकरी मंडळाकडून माघवारी पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा शुक्रवारी (दि. २७) दुपारी ३.३० वाजता नॉर्थकोर्ट मैदानावर होणार आहे. यावेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाला सोलापुरात आणण्यात येणार आहे.
अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह भ. प. सुधाकर महाराज इंगळे म्हणाले, शुक्रवार दि. २७ रोजी आषाढी वारीतील माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण होणार आहे. श्री मार्कंडेय मंदिर पंचकट्टा या ठिकाणी दु. ३.३० वा. वारकरी परंपरेप्रमाणे ह.भ.प. श्री. बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष ). ह.भ.प. श्री. दत्तात्रय भोसले (शहर सचिव) यांच्या माध्यमातून नित्यनेम पुर्ण करुन ह.भ.प. भागवत महाराज चवरे, पंढरपूर (राष्ट्रीय उपाध्यक्ष), मधुकर गायकवाड (समिती अध्यक्ष), शंकर भोसले (समिती अध्यक्ष), नामदेव पुलगम ( शहर संपर्क प्रमुख) या मान्यवरांच्या शुभहस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व श्री संत तुकाराम महाराज पालखी पूजन करण्यात येणार आहे. तद्नंतर पद्मशाली ज्ञाती संस्था, सोलापूर सुरेश फलमारी, किरण चिप्पा (शहर सहअध्यक्ष), श्रीकांत ढगे (पालखी प्रमुख), दगडू डोंगरे (विभागीय उपाध्यक्ष) यांचेकडून रिंगणातील अश्वाचे पूजन करण्यात येईल.
उपस्थित सर्व दिंडीचा विणेकरी महाराजांचा सन्मान करण्यात येणार आहे. परंपरेचे अभंग झाल्यानंतर पालखी प्रस्थान सुरु होईल. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध भागातील भाविक वारकरी पंढरीसी जारे आल्यानो संसारा।" या न्यायाने माघवारी निमित्त पंढरपूरला पायी चालत जातात. त्या सर्व दिंडीतील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा मार्गस्थ होतो. तेथून ही पालखी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानात आल्यानंतर सर्व चौपदारांकडून रिंगण लाऊन घेतले जाते.
उपस्थित मान्यवरांचा अखिल भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), बळिराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), किसन बापू कापसे (प्रदेशाध्यक्ष ), मोहन शेळके (प्रदेश सचिव), संजय पवार (शहराध्यक्ष), छाया खंडाळकर यांच्याकडून श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात येईल. तसेच रिंगण सोहळ्याचे तपःपूर्ती वर्ष असल्यामुळे उपस्थित दिंडी प्रमुख व पालखी प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर रिंगण सोहळा सुरु करण्यात येईल. रिंगण पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळा परंपरेने महादेव मंदिर, साठे चाळ सोलापूर या ठिकाणी येऊन आनंद चंदनशिवे, विजय चोरमुले यांचे हस्ते आरती होऊन नित्यनेमाचे कीर्तन करून समारोप केला जाणार आहे, असे ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांनी सांगितले.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन वारकरी मंडळाकडून करण्यात आले आहे. ह. भ. प. श्री. सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांचे मार्गदर्शनाने माघवारी पालखी सोहळा व रिंगण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी तानाजी बेलेराव (प्रदेश संघटक), कुमार गायकवाड (जिल्हा सचिव), सचिन गायकवाड (शहराध्यक्ष), निवृत्ती मोरे (शहर कोषाध्यक्ष), अभिमन्यु डोंगरे महाराज, संजय केसरे (युवा समिती अध्यक्ष ), श्याम येदुर (युवा समिती उपाध्यक्ष) आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.