ह.भ प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर सोलापूरात करणार पसायदानावर निरूपण

श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानतर्फे त्रिदिवसीय प्रवचने

ह.भ प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर सोलापूरात करणार पसायदानावर निरूपण

सोलापूर : प्रतिनिधी

श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या विद्यमाने येत्या मंगळवार ८ नोव्हेंबर ते गुरुवार १० नोव्हेंबर दरम्यान रोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत हुतात्मा स्मृती मंदिर येथे ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठ उपासक आणि प्रवचनकार ह.भ प. श्री चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांच्या पसायदान विषयावरील त्रिदिवसीय प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशलाल मानधनिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संत मोरारीबापू यांच्या प्रेरणेने संस्थेची स्थापना झाली असून अध्यात्म तसेच सामाजिक कार्याचे उद्दिष्ट स्वीकारत १९९८ पासून संस्था सोलापूरात कार्यरत आहे.

गेली बारा वर्षे संस्था ह.भ.प. चैतन्य महाराजांच्या अभ्यासपूर्ण चिंतनाचा लाभ शहरवासियांना घडवीत आहे. मागील सलग दोन वर्षे कोविडमुळे प्रवचनांचे आयोजन होऊ शकले नव्हते. ह्यापूर्वी चैतन्य महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातील कर्म, ज्ञान, भक्ती, दैवी संपत्ती, गुरू महिमा, श्रीकृष्ण, मन, बुध्दी आणि अवधान ह्या विषयांवर केलेल्या प्रवचनांस भाविकांनी जिज्ञासूंनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.

त्रिदिवसीय प्रवचनमालेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गणेशलाल मानधनिया,  उपाध्यक्ष वेणुगोपाल तापडिया, सचिव श्रीकांत भुतडा, विश्वस्त समिती सदस्य गोपाल सोमाणी, शामसुंदर बलदवा, सूर्यनारायण रघोजी, विष्णुकांत मानधनिया, रमेश भुतडा, रामानुज होलाणी, ज्ञानेश्वर दिवटे, संजीव कुसुरकर यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस सचिव श्रीकांत भुतडा, विश्वस्त समिती सदस्य विष्णुकांत मानधनिया, ज्ञानेश्वर दिवटे, संजीव कुसुरकर आदी उपस्थित होते