सोलापूरकरांनो, 'या' वयोगटाचे लसीकरण उद्या नाही
महापालिकेचा निर्णय
सोलापूर : प्रतिनिधी
सध्या सुरू असलेले ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण उद्या (सोमवारी) होणार नाही. सोमवारी केवळ ४५ वर्षांपुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार असल्याचे सोलापूर महानगरपालिकेने जाहीर केले आहे.
दाराशा, साबळे, भावनाऋषी, मदर तेरेसा (डफरीन चौक), मुद्रा सनसिटी, रामवाडी, सोरेगाव, देगाव, मजरेवाडी, जोडभावी, विडी घरकुल, बाळे, नई जिंदगी, शेळगी, सिव्हिल या सोलापूर महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांवर ४६ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस ऑनलाईन पध्दतीने ३० जणांना, ऑन ड स्पॉट ३० जणांना, दुसरा डोस ऑनलाईन पध्दतीने २० तर ऑन द स्पॉट २० जणांना देण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------
१८ ते ४४ च्या प्रतीक्षेत नागरिक
१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण कधी होणार याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. २१ जूनपासून या वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते. मात्र अद्याप शासनाकडून याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.