अपोलो फर्टिलिटी पूर्ण करणार मातृत्वाचे स्वप्न

एकाच छताखाली सोलापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा

अपोलो फर्टिलिटी पूर्ण करणार मातृत्वाचे स्वप्न

सोलापूर : प्रतिनिधी

मूल न झाल्यामुळे निराश असणाऱ्या जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देणारे अपोलो फर्टिलिटी हॉस्पिटल सोलापूरात सुरू झाल्याची माहिती डॉ.मीनल चिडगुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथे अपोलो हेल्थ अँड लाईफ स्टाईल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी चंद्रशेखर यांच्या माध्यमातून
एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सम्राट चौकातील चिडगुपकर हॉस्पिटलच्या आवारात हे अपोलो हॉस्पिटल सुरू होत आहे. सोलापूरात सुरू होणारे हे केंद्र महाराष्ट्रातील तिसरे आहे. येथे एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळणार आहेत.

अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय अभ्यासक डॉक्टर यांच्या माध्यमातून ही सेवा सोलापूर आणि परिसरातील रुग्णांना मिळणार आहे.

अपोलो हेल्थ अँड लाईफ स्टाईल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी चंद्रशेखर यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांपूर्वी बदलती जीवनशैली, प्रदूषण, झोपेच्या समस्या, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान अशा कारणांमुळे भारतात वंध्यत्वाची समस्या वाढत चालली आहे. एका सर्व्हेक्षणानुसार एकूण लोकसंख्येत १० ते १४ टक्के लोकांना ही समस्या असून शहरी भागात १० पैकी तब्बल ६ जोडप्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरुष  व महिला यांच्या अंतर्गत समस्या सोडवून त्यांना मातृत्व आणि पितृत्वाचा आनंद मिळवून देण्यासाठी ओपोलो हॉस्पिटल वैद्यकीय उपचार करणार असल्याचे डॉ.चिडगुपकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस डॉ. ए. सेल्वम, रवी चंदर आदी उपस्थित होते.