राष्ट्रवादी काँग्रेसने राबवला 'आरोग्याची वारी आपल्या दारी' उपक्रम

उपमुख्यमंत्री अजित पवार अन् प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

राष्ट्रवादी काँग्रेसने राबवला 'आरोग्याची वारी आपल्या दारी' उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'आरोग्याची वारी आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत फिरता दवाखान्यातून आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

'माझा प्रभाग माझे कुटूंब', 'आरोग्यची वारी आपल्या दारी' या संकल्पनेतून प्रभाग क्र १० गोंधळी वस्ती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला समन्वयक शशिकला कसपटे यांच्या शुभहस्ते या आरोग्य व्हॅन (फिरता दवाखाना ) आरोग्य वारीचे गोंधळी वस्ती येथे शुभारंभ करण्यात आला. ही आरोग्य

वारी रंगराज नगर, ए., बी., सी., डी., जी., एफ.  ग्रुप, सागर चौक, लक्ष्मी चौक, पोशम्मा मंदिर सर्व प्रभागात नागरिकांपर्यंत जाईल. यात मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केला जाणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या आरोग्य वारीच्या शुभारंभाच्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.

या व्हॅनमध्ये डाॅक्टर, सिस्टर, ब्रदर व  औषध गोळ्या बी. पी. तपासणी शुगर तपासणी याची सर्व व्यवस्था केली आहे. या उपक्रमांचे आयोजन व्हीजेएनटी शहराध्यक्ष रुपेशकुमार भोसले यांनी केले आहे. पिंडीपोल हाॅस्पिटलचे डाॅ. श्रीनिवास पिंडीपोल व त्यांच्या पत्नी डाॅ. सौ. पिंडीपोल व इतर त्यांचे सहकारी डाॅक्टर यांचा सहभाग आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष  पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, महिला समन्वयक शशीकला कसपटे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, संतोष शांदे पाटील, ज्ञानु शिंदे, पाटील, रवि वाघमारे, सनी वाघमारे, मारुती पाचंगे, गोपाळ पाचंगे, नागनाथ पाचंगे, अंबादास वाघमारे, विकी चौगुले, विजय माने, राजू भोसले, लखन गायकवाड, नितीन पाचंगे, दया पाचंगे, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण पाचंगे, अंबादास भोसले, प्रेम भोसले, मारुती ईगवे व महिला, युवती, युवक, जेष्ठ नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.