अलर्ट ! गणेशोत्सव मंडळांसाठी महत्वाची बातमी
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी काय केले आवाहन ? वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातील गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची शासनाकडून अचानक तपासणी करण्यात येणार आहे. त्याकरिता पथके तयार करण्यात आली आहेत.
सोलापूर शहरामध्ये गणोत्सवाकरीता सुमारे १२०० मंडप / पेंडॉलचे परवाने सोलापूर महानगरपालिकेकडून वितरीत होतात. महापालिका क्षेत्रामध्ये आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडप/ पेंडॉल तपासणी करण्यासाठी एकूण ८ विभाग निहाय मंडप/पेंडॉल तपासणीकामी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकाकडून मंडप / पेंडॉलची तपासणी करण्यात येणार आहे. पथकावर नियंत्रण ठेवणेकामी नियंत्रण पथकाची नियुक्ती करीत असल्याबाबत सुचना दिलेले आहेत. सदर नियंत्रण पथकामध्ये महसूल विभागातील तहसिलदार, पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक / सहा. पोलीस निरीक्षक, सोलापूर महानगरपालिकेतील सहा. आयुक्त, तसेच महावितरणमधील अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र. १ यांनी कळविले आहे.
नियंत्रण पथकाकडुन आगामी गणोत्सवाच्या अनुषंगाने मंडप / पेंडॉलचे अचानकपणे तपासणी करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिका हद्दील सर्व गणोत्सव मंडळ / संघटनांना तसेच नागरीकांना सदर मंडप/पेंडॉल तपासणी कामी आलेले पथकास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र. १ यांनी केले आहे.