'लीमोर स्टे अँड डाईन' चे उद्या उद्घाटन

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते होणार शुभारंभ

'लीमोर स्टे अँड डाईन' चे उद्या उद्घाटन

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर - पुणे रस्त्यावरील बाळे चौकात उभारण्यात आलेल्या बाबासाहेब भवर यांच्या अत्यंत लक्झेरिअस 'लीमोर स्टे अँड डाईन' चे उद्घाटन शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या हस्ते उद्या रविवार (दि. १०) रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे, अशी माहिती बाबासाहेब भवर यांनी दिली.

या कार्यक्रमास शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांची प्रमुख उपस्थिती असेल. हॉटेल, लक्झेरिअस ॲम्बियन्स 
 आणि रुचकर भोजन अशी वैशिष्ट्ये असलेले 'लीमोर स्टे अँड डाईन' ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.  एसी रूम्स, एसी सुट, फॅमिली रेस्टॉरंट,  रुफ टॉप, बार अँड रेस्टॉरंट अशा अनेक अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सोलापूर हे शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले शहर आहे. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असेही सोलापूरला म्हटले जाते. सोलापुरातून देशभरातील पर्यटक ये - जा करतात. त्यामुळे अत्यंत उच्च दर्जाचे आणि मुंबई, पुणे या शहरांप्रमाणे सुविधा असलेले हॉटेल आणि लॉज पर्यटकांना आणि सोलापुरातील ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे या हेतूने 'लीमोर स्टे अँड डाईन' सुरू करण्यात आले आहे, असे बाबासाहेब भवरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही श्रावण भवर, बाबासाहेब भवर आणि अतुल भवर यांनी केले आहे.