युवासेना शहर युवा अधिकारीपदी अर्जुन शिवसिंगवाले
नव्या निवडीमुळे युवासैनिकांत उत्साह : मनिष काळजे
सोलापूर : प्रतिनिधी
युवा सेनेच्या शहर युवा अधिकारीपदी अर्जुन शिवसिंगवाले तर समन्वयकपदी योगेश सलगर यांची निवड करण्यात आली. युवासेना प्रमुख व पर्यावरणमंत्री
आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि युवासेना राज्यविस्तारक विपुल पिंगळे यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.
या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून निवडी कायम करण्यात येतील, असे युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी कळविले आहे.
याबाबत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे म्हणाले, आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या निवडी करण्यात आल्या आहेत.
नव्या निवडी आणि पदे पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट विधानसभा • उपजिल्हा युवा अधिकारी : महेश गुंडे , प्रदीप भरमशेट्टी . तालुका युवा अधिकारी : विश्वनाथ जवळगे . उपतालुका युवा अधिकारी : बसवराज बिराजदार , महेश बिराजदार , चेतन अंटद . तालुका समन्वयक : तुकाराम चव्हाण , विशाल किणगे . तालुका चिटणीस : अजय राठोड , अवधूत कोरे . तालुका सचिव : महादेव कोळी . शहर युवा अधिकारी विनोद मदने . उपशहर युवा अधिकारी : धनराज हिळ्ळी , युवराज भोळे . :
दक्षिण विधानसभा उपजिल्हा युवा अधिकारी : आकाश गगंदे , सोमलिंग पुजारी . तालुका युवा अधिकारी : धर्मराज बगले ( ग्रामीण ) . उपतालुका युवा अधिकारी : सागर कोकरे , उमेश कुंभार , रमेश निंबर्गी ( ग्रामीण ) . तालुका सचिव : बिरप्पा वरवटे , विरेश पाटील ( ग्रामीण ) . तालुका चिटणीस : सिराज मकानदार ( ग्रामीण ) . तालुका समन्वयक : संतोष बरुटे ( ग्रामीण ) . शहर युवा अधिकारी : आकाश कोळी ( दक्षिण विधानसभा ग्रामीण मुंद्रुप शहर ) . उपशहर युवा अधिकारी : अभी वेर्णेकर , विशाल नंदुरे ( मुंद्रुप शहर ) . विधानसभा युवा अधिकारी : सुधाकर बिराजदार ( दक्षिण विधानसभा ) .
सोलापूर शहर ( मध्य व उत्तर ) विधानसभा उपजिल्हा युवा अधिकारी : अॅड . दयानंद शिंदे , सोलापूर शहर ( मध्य व उत्तर ) . शहर युवा अधिकारी : अर्जुन शिवसिंगवाले ( सोलापूर शहर ) . उपशहर युवा अधिकारी : रणधीर स्वामी . शहर समन्वयक : योगेश सलगर . शहर चिटणीस : संदीप वेल्लाळ . कॉलेज कक्ष : सुशांत काटमे ( शहर ) , सुजित खुर्द ( सोलापूर जिल्हा )
-------------
मनपा, जि.प. वर फडकवणार शिवसेनेचा भगवा
सर्वसामान्य युवा शिवसैनिकांना या नव्या निवडीत स्थान देण्यात आले आहे त्यामुळे पक्षात आनंदाचे वातावरण आहे. आता युवासेना जोमाने कामाला लागणार असून आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवासेना जोरदार कार्य करणार आहे.
-- मनीष काळजे, जिल्हाप्रमुख, युवासेना