मतदार यादीबाबत शासनाची विशेष मोहिम
सोलापूरकरांनी लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकांवर अधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने दि ०३ डिसेंबर (शनिवार) व ४ डिसेंबर (रविवार), २०२२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातर्गत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलींद शंभरकर यांनी कळविले आहे.
सदर विशेष मोहिमेमध्ये अस्तिवात असेलेली मतदार यादी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी व तपासण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात येणार असून नागरिकांनी मतदार यादीमध्ये नोंदी तपासून घ्याव्यात. मतदार यादीमध्ये नोंदणी झालेल्या मतदारांच्या नोंदणीचे प्रमाणीकरण करणेची कार्यवाही सुरू असल्याने मतदारांनी त्यांचा आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी त्याचे आधार क्रमांक संबंधित बीएलओ यांचेकडे द्यावेत.
मतदार यादीमधील नोंदणीबाबत हरकती. नोंदीमध्ये दुरुस्ती व नवीन नाव नोंदणी करावयाची सुविधा मोहिमेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रादर मोहिमेमध्ये मयत मतदार, कायम स्थलांतरीत मतदार व लग्न होवून बाहेर गेलेल्या महिला मतदार नावाची वगळणी. तसेच लग्न होवून आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, PWD (दिव्यांग) मतदार चिन्हांकीत करणे त्याचबरोबर दि ०१ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहेत त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करणे, ज्यांचे दि ०१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ पूर्ण होणार आहेत. त्यांच्याकडून नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
तरी, दि ०३ डिसेंबर (शनिवार) व ४ डिसेंबर (रविवार), २०२२ रोजीच्या विशेष मोहिमेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी केले आहे.