भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा आज सत्कार

उपस्थित राहण्याचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांचे आवाहन

भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा आज सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा सत्कार उद्या (शनिवारी) दुपारी ४ वाजता एम्प्लॉयमेंट चौक येथील शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

शहर भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभास खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खा. रणजीतसिंह नाईक - निंबाळकर, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. प्रशांत परिचारक,  आ. समाधान अवताडे, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, आ. राजेंद्र राऊत, विक्रम देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी केले आहे.