मनीष काळजे यांच्यासह चौघांना मिळाली 'ही' संधी
शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्यासह चौघांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार या निवडी करण्यात आल्या.
शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह महेश साठे, चरणराज चवरे, महेश चिवटे यांचीही जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी (दि. २८) दुपारी एक वाजता सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना पाठवले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी स्थान मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .