मनिष काळजे यांचा पुरूषोत्तम बरडे यांना टोला
आम्ही दाखवली हिंमत : पुढेही दाखवू
सोलापूर : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात असलेल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीवरती करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण राज्य शासनाने आज जमीनदोस्त केले. यावरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना टोला लगावला आहे.
जिल्हाप्रमुख श्री. काळजे म्हणाले, हे सरकार हिंदुत्ववादी आहे. खरे हिंदुत्व म्हणजे काय असते हे केवळ महाराष्ट्राने नव्हे तर आज अवघ्या देशाने पाहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच सांगितले आहे की आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत.
व्हिडिओ -
मागील अडीच वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालावर नाचणारे सरकार होते. ते हिंदुत्वाचे सरकार नव्हते तर ते बेगडी सरकार होते.
सोलापुरात कुणीतरी म्हटले होते की हिम्मत दाखवावी. आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो. या सरकारची हिंमत तुम्हाला आता समजली असेल, असा टोलाही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना लगावला आहे.
भविष्यात देखील जिथे जिथे गरज लागेल तिथे आम्ही नक्कीच हिंमत दाखवू, असेही जिल्हाप्रमुख मनीष काळजे यावेळी म्हणाले.