उद्यापासून रोज संध्याकाळी ५ नंतर सोलापूरात संचारबंदी
बाजारपेठा राहणार रोज दुपारी ४ वाजेपर्यंत
सोलापूर : प्रतिनिधी
कोव्हिड १९ च्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार उद्यापासून सोलापूर शहरात सायंकाळी ५ नंतर संचारबंदी राहणार आहे.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकाने रोज दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असून बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने शनिवार, रविवारी पूर्णपणे बंद राहतील.
भाजी, फळे यांची विक्री संपूर्ण आठवडाभर सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत करता येईल. तर मैदाने पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.
हॉटेल सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू राहणार आहे.
महापालिकेने सूट दिलेल्या व्यतिरिक्त सर्व खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी :