उत्कृष्ट रुग्ण सेवेमुळेच सोलापूर केअर हॉस्पिटलवर सोलापूरकरांचा विश्वास

श्री श्री शिवराज महास्वामीजी : सोलापूर केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा वर्धापन दिन उत्साहात

उत्कृष्ट रुग्ण सेवेमुळेच सोलापूर केअर हॉस्पिटलवर सोलापूरकरांचा विश्वास

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर केअर हॉस्पीटलच्या नावातच काळजी आहे. नावाप्रमाणे सोलापूर केअर हॉस्पिटलने उत्कृष्ठ रुग्णसेवा दिली आहे. त्यामुळेच सोलापूरकरांचा या हॉस्पिटलवर विश्वास आहे, असे प्रतिपादन श्री श्री शिवराज महास्वामीजी (वेळापूर) यांनी केले.

विजयपुर रस्त्यावरील सोलापूर केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा यशस्वी सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. त्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. बसवराज शास्त्री हिरेमठ, शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले, अध्यात्माची जोड दिल्याने व्यवसायाला तत्वाधिष्टता मिळते. सोलापूर केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरवर्ग उच्चशिक्षित आणि माफक दरात उत्कृष्ठ उपचार करणारे असल्याने रुग्ण या ठिकाणीच उपचार घेण्यास प्राधान्य देतात. रुग्णालयाच्या मोठे होण्यात येथील कर्मचाऱ्यांच्या सेवेचाही तितकाच मोठा हातभार आहे असेही डॉ. शेटे म्हणाले.

याप्रसंगी हॉस्पीटलचे प्रेसिडेंट डॉ. मल्लिकार्जुन तरन्नळी यांनी तज्ञ डॉक्टरांचा समूह, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग या जोरावरच हॉस्पिटलने प्रगती केल्याचे सांगीतले. यावेळी दक्षिण सोलापूरचे तहसिलदार अमोल कुंभार, दक्षिण सोलापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड, सुदीप चाकोते, बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, डॉ. संस्कृती वळसंगकर, डॉ. आतिश बोराडे, डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. नीलकंठ पोतदार, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. वर्षा पाटील, रविंद्र गुजराती, राजीव दीपाली यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास सोलापूर केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रेसिडेंट डॉ. मल्लिकार्जुन तरन्नळी, चेअरमन डॉ. अनिल हविनाळे, व्हा. चेअरमन डॉ. सचिन नरोटे, सचिव डॉ. प्रशांत दौंड, सहसचिव डॉ. राजकुमार पाटील, व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक कांबळे, खजिनदार डॉ. पंचय्या स्वामी, सहखजिनदार डॉ.  प्रशांत गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत शहा, सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आप्पासाहेब उमदी, प्रशासकीय अधिकारी उज्वल पाटील आदी उपस्थित होते. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. प्रशांत दौंड यांनी आभारप्रदर्शन केले. वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील तज्ञ डॉक्टर्स आणि हितचिंतक यांनी सोलापूर केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
---------------------------------