स्ट्रीट बाजारसाठी बुधवारी लिलाव
भाग घेण्याचे महापालिकेचे आवाहन
(संग्रहित छायाचित्र)
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या स्ट्रीट बझार येथील २० गाळे आणि १५ खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या गाड्यासाठीची जागा भाड्याने देण्यासाठी ऑफलाइन लिलाव बुधवारी (ता. २७ ऑक्टोबर ) रोजी सकाळी ११ वाजता स्ट्रीट बाजार या ठिकाणी करण्यात येणार आहे.
सदरची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. सदर २० गाळेपैकी मध्ये ७ गाळे कापड/गारमेंट्स/वस्त्र; ३ गाळे ज्वेलरी, ५ गाळे कलाकुसरीच्या वस्तू, ५ गाळे बंद पाकीटमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ यासाठी राखून ठेवलेले आहेत. त्याच बरोबर १५ खाद्य विक्रेते करणाऱ्या गाड्यासाठी मोकळी जागा राखून ठेवलेली आहे. सदरच्या गाळ्यांमध्ये १ गाळा दिव्यांगासाठी आरक्षित केलेला आहे. या लिलावमध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये इतके ठेवण्यात आलेले आहे. सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी ३ आयकार्ड साइझचे फोटो,आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ऍक्ट लायसन्स यांच्या स्व-साक्षांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे. याबाबत अधिकच्या माहितीसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाशी कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.