सोलापूरकरांसाठी पोलिस आयुक्तांचा महत्वाचा आदेश
शहरात कडक जमावबंदी
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरात उद्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक जमावबंदी लागू करण्याचा आदेश पोलिस आयुक्त हरिष बैजल यांनी काढले आहेत. त्रिपुरामधील कथित घटनेनंतर राज्यभरात मोर्चे, आंदोलने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे.
अशा मोर्चे, आंदोलनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होत आहे. सोलापूर शहरात देखील असे मोर्चे, आंदोलने होण्याची शक्यता आहे. परिणामी गर्दी होऊन कोरोना संसर्ग होऊ शकतो. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पोलिस आयुक्त हरिष बैजल यांनी कडक जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार कोणालाही मोर्चे, धरणे, मिरवणुका, रॅली, निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त हरिष बैजल यांनी सांगितले.