कॉ. नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनी ५१८ रक्तदात्यांनी केले रक्तदान
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापकीय सदस्य, स्वातंत्र्यसैनिक कॉ. नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनीचे औचित्यसाधून ५१८ जणांनी रक्तदान केले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने पक्षाचे कार्यालय दत्त नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माकपचे जिल्हा सचिव अँड. एम. एच. शेख व अशोक इंदापुरे यांच्या हस्ते तर कॉ. गोदूताई परुळेकर नगर कुंभारी येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम व माजी नगरसेविका कॉ. कामिनी आडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रे नगर चेअरमन नलिनी कलबुर्गी, माजी नगरसेविका नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कुरमय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, अँड.अनिल वासम, हसन शेख, दाऊद शेख, नरेश दुगाणे, लिंगवा सोलापूरे, शकुंतला पाणीभाते, विरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, सनी शेट्टी, आप्पाशा चांगले, रफिक काझी, मधुकर चिल्लाळ, अकील शेख, इलियास सिद्दीकी, दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्याळ, नरेश गुल्लापल्ली,आसिफ पठाण, मल्लिकार्जुन बेलीयर, बालाजी गुंडे, मल्लेशम कारमपुरी, शाम आडम आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय, इरय्या बोल्ली, सिद्धेश्वर, सोलापूर आदी रक्तपेढ्यानी रक्तसंकलन केले. याप्रसंगी एकूण ५१८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.