श्री राजस्थानी ब्राह्मण समाज संस्थेच्या अध्यक्षपदी बालाप्रसाद ओझा
सचिवपदी के. के. तिवारी
सोलापूर : प्रतिनिधी
श्री राजस्थानी ब्राह्मण समाज संस्थेच्या
अध्यक्षपदी बालाप्रसाद ओझा तर सचिवपदी के. के. तिवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेची सर्वसाधारण सभा चाटी गल्लीतील गायत्री भवन येथे झाली.
या सभेमध्ये राजस्थानी ब्राह्मण समाज संस्थेच्या नूतन कार्यकारिणी मंडळाची निवडणूक पार पडली. यावेळी निवडी करण्यात आल्या. संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : बालाप्रसाद ओझा, कार्याध्यक्ष : जुगलकिशोर तिवाडी, उपाध्यक्ष : मदनगोपाल खंडेलवाल, कोषाध्यक्ष : श्रीनिवास दायमा, सचिव : के के तिवारी, सहसचिव : धनराज गौड, कार्यकारिणी सदस्य : श्याम खंडेलवाल, विठ्ठल दायमा, राजेंद्र पारीक, अशोक गौड.
निर्वाचन निरीक्षक नवनीत दायमानी यांनी ही निवडणूक बिनविरोध आणि एकमताने झाल्याची घोषणा केली. यानंतर नूतन अध्यक्ष बालाप्रसाद ओझा यांनी संस्थेच्या नियमाप्रमाणे ५ व्यक्तींची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली. नवनियुक्त कार्यकारणी सदस्य पुढीलप्रमाणे : दिलीप पारीक, तिलक उपाध्ये, मनीष पंचारिया, अशोक उपाध्ये, अशोक उपाध्ये. यावेळी जबरचंद शर्मा यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. सचिव के. के. तिवारींनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ समाज सेवक विजयकुमार उपाध्ये, सीताराम खंडेलवाल, नंदकिशोर पंचारिया, संजीवकुमार व्यास, राजाराम उपाध्ये, वल्लभदास जोशी, श्रीप्रकाश उपाध्ये, चंद्रकांत जोशी, दामोदर जोशी, सीताराम पारिक, रुपेश उपाध्ये, ओमप्रकाश द्विवेदी, अशोक शर्मा, अशोक जोशी आदी सभासद उपस्थित होते.
उपस्थित सर्व सभासदांकडून नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळाचा माल्यार्पण करून व गुलाल उधळून सत्कार करण्यात आला.