दोन तुकडे झालेला हात डॉ. हिरेमठ यांनी केला पूर्ववत

अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

दोन तुकडे झालेला हात डॉ. हिरेमठ यांनी केला पूर्ववत

सोलापूर ः प्रतिनिधी

एक हात पूर्णपणे तुटलेला आणि दुसऱ्या हाताती पिशवीत तुटलेल्या हाताचा दुसरा भाग घेऊन रूग्ण आला. आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत डॉ. शरणबसव हिरेमठ यांनी पूर्णपणे तुटलेला हात पुन्हा जोडून पूर्ववत बसविला.

उमरगा येथील तरूण शेतकरी महावीर माळी हे शेतात काम करत असताना सोयाबीनच्या यंत्रात त्यांचा हात अडकला. यंत्रात हात अडकल्यामुळे हात कोपरा आणि मनगटाच्या मधून पूर्णपणे तुटला. हाताचे दोन तुकडे झाले होते. तुटलेला हात अक्षरशः पिशवीत घेऊन महावीर माळी हे डॉ. हिरेमठ यांच्याकडे पोहचले. त्यांच्या हाताला भूल देऊन सोलापूरात त्यांच्यावर तब्बल आठ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा शस्त्रक्रियेनंतर तीन ते चार दिवसांत हाताच्या तुटलेल्या भागात तयार झालेले विष रक्तवाटे शरीरात

पसरते. परिणामी रूग्ण अत्यवस्थ होतो. महावीर माळींचीही स्थितीही अत्यवस्थ झाली होती. परंतु डॉ. हिरेमठ यांनी त्यांना औषधोपचार करून त्यांना या संकटातून बाहेर काढले. घरची जबाबदारी असलेल्या महावीर माळी यांचा हात पूर्ववत जोडल्याने रूग्ण आणि कुटुंबियांनी सत्कार करून डॉ. हिरेमठ यांचे आभार मानले.