फ्युचर शॉपीच्या मोफत इन्स्टिट्यूटचे उदघाटन

मोफत आरोग्य तपासणी : सायली जोशी, पेंटप्पा गड्डम यांची प्रमुख उपस्थिती

फ्युचर शॉपीच्या मोफत इन्स्टिट्यूटचे उदघाटन

सोलापूर : प्रतिनिधी

फ्युचर शॉपी स्टोअर्स प्रा. लि. च्या फ्रि कोर्सेस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन बुधवारी साई महिला प्रतिष्ठानच्या सचिव सायली जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, निमा संघटनेच्या अध्यक्षा डॉ. स्मिता भोप, कंपनीचे संचालक महेश केसकर, संचालिका आरती बंडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सात रस्ता येथील गुरुशरण संकुलमधील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, निमा संघटनेच्या अध्यक्षा डॉ. स्मिता भोप, कंपनीचे संचालक महेश केसकर, संचालिका आरती बंडी होत्या.

याप्रसंगी सायली जोशी म्हणाल्या, फ्युचर शॉपीने अतिशय अल्पदरात अनेक सुविधा कार्डधारकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, औषधे सवलतीच्या दरात मिळण्याबरोबरच टॅली, इंग्रजी संभाषण वर्ग, डीटीपी सारखे आवश्यक अभ्यासक्रम, आरोग्य तपासणी आदी सुविधा मोफत उपलब्ध करून देणे कौतुकास्पद आहे. यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटपा गड्डम म्हणाले, मोठ्या शहरांप्रमाणे सोलापूरातही अशा सुविधा नागरिकांना मिळत आहेत ही समाधानाची बाब आहे. कोविडचा काळ असूनही स्मार्ट सिटीत स्मार्ट योजना नागरिकांसाठी फ्युचर शॉपीने दिल्या आहेत. डॉ. स्मिता भोप यांनीही मनोगत व्यक्त केले. उदघाटनानंतर दिवसभर कंपनीच्या माय कार्डधारकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

संचालक महेश केसकर यांनी प्रास्ताविक केले. रुपाली घाळे यांनी सूत्रसंचालन तर संचालिका आरती बंडी यांनी आभार प्रदर्शन केले.
----------
फ्युचर शॉपीच्या कार्डधारकांना मिळणार या सुविधा
फ्युचर शॉपी स्टोअर्स प्रा. लि. ने माय कार्डधारकांसाठी मोफत कोर्सच्या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचा टॅली, डीटीपी किंवा संभाषण वर्गाचा अभ्यासक्रम फ्युचर शॉपीच्या माय कार्डधारकांना मोफत मिळणार आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणी योजनेंतर्गत शुगर, सीबीसी, दंत तपासणी, प्रसूती तज्ज्ञांकडून
तपासणी, जनरल प्रॅक्टिशनरकडून तपासणी असे लाभ मिळणार आहेत. फ्युचर शॉपीच्या माय कार्डधारकांनी फ्री कोर्सेस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटद्वारे चालविण्यात येणाऱ्या मोफत अभ्यासक्रमांचा आणि आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा आणि नागरिकांनी माय कार्डसाठी सात रस्ता येथील गुरुशरण संकुलातील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन फ्युचर शॉपीचे संचालक महेश केसकर आणि संचालिका आरती बंडी यांनी केले आहे.
------------------------------