चोराने पळवली चक्क रिव्हॉल्वर !

विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल

चोराने पळवली चक्क रिव्हॉल्वर !

सोलापूर : प्रतिनिधी

चोरी करण्यासाठी घरात शिरलेल्या चोराने चक्क रिव्हॉल्व्हर पळवण्याची घटना सोलापूरात घडली आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे.

विजयपूर रस्त्यावरील ओम गर्जना चौक येथील द्वारका नगर येथे राहणारे चंदप्पा काशीराय क्षत्री हे देवकार्य साठी सहकुटुंब कर्नाटकातील मदनहळी (ता. सिंदगी, जि. विजयपूर) या आपल्या मूळ गावी गेले होते. त्यामुळे १६ ते १८ एप्रिल दरम्यान त्यांचे घर बंद होते. यादरम्यान चोरांनी सेफ्टी डोअरचे कुलूप उघडून लगतच्या दरवाजाचे कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी चंदप्पा क्षत्री यांचे ५० हजार रूपये किमतीचे रिव्हॉल्व्हर चोरले. तसेच १४ जिवंत राऊंडही चोरून नेले. यावेळी चोरट्यांच्या हाती एक तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, अर्ध्या तोळ्याची सोन्याची कर्णफुलेही लागली. तीही चोरट्यांनी पळवली. याबाबत विजयपूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.