महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी पालकमंत्र्यांचे श्री रुपाभवानी देवीला साकडे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटस्थापनेदिवशी घेतले दर्शन

महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी पालकमंत्र्यांचे श्री रुपाभवानी देवीला साकडे

सोलापूर : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आई श्री रुपाभवानी देवीला साकडे घातले, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी श्री रूपाभवानी देवीचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी आई जगदंबेवर खूप श्रद्धा आहे. सकाळी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी, दुपारी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन मी सोलापुरात श्री रूपाभवानी देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील सर्व मुली, महिला भगिनी, नागरिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांना सुखात ठेव. अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळू दे. शेतकऱ्यांवरील संकट टळू दे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा येऊन आम्हाला जनतेच्या सेवेची संधी मिळू दे, अशी प्रार्थना श्री रूपाभवानी देवीकडे केल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, मोहन डांगरे, मल्लिनाथ मसरे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी, बिपिन धुम्मा, राहुल डांगरे, वसंत जाधव आदी उपस्थित होते.