अरे वा ! महाराष्ट्र आला देशात पहिल्या क्रमांकावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

अरे वा ! महाराष्ट्र आला देशात पहिल्या क्रमांकावर

सोलापूर : प्रतिनिधी

स्टार्ट अप आणि गुंतवणूकीच्या क्षेत्रात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

देशातील ६६ टक्क्यांपेक्षा जास्त स्टार्ट अप आणि गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात सुरु झाले आहेत. भरीव निधीची तरतुद आणि धोरणात्मक गुंतवणूकीमुळे स्टार्ट अप क्षेत्रात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे.

आऊटलुक मॅगझीनने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. ही माहिती जाहीर होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सर्वांना दिली.

महाराष्ट्रातील उद्योगधंदे परराज्यात गेल्याच्या आरोपावरून राज्यातील वातावरण तापले होते. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्टार्ट अप बाबत सर्वेक्षणातील नवीन माहिती समोर आल्यामुळे आता विरोधकांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

उद्योग क्षेत्रात प्रगत राज्य मानल्या गेलेल्या गुजरातसकट देशातील सर्व राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम राहिला आहे.

महाराष्ट्राला स्टार्ट अप मिशनमध्ये पुढे नेणाऱ्या तरूण उद्योजकांचे खूप अभिनंदनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.