सोलापूरकर, ढोलताशा पथकांचे वादन नसल्याने गणेशोत्सवाची मजा येत नाहीये ना ? हा व्हिडीओ पहा
आठवणीतला गणेशोत्सव : विश्वविनायक वाद्यवृंद पथक
पुरूषोत्तम कारकल
गणेशोत्सव म्हटला की बाप्पांची आकर्षक मूर्ती, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूका आणि जल्लोष आलाच. परंतु गणेशोत्सवात जर ढोल - ताशा पथकांचे बहारदार वादन नसेल तर गणेशोत्सव जणू पूर्णत्वास जात नाही. गेल्या काही वर्षांपासून तर सोलापूरात गणेशोत्सव आणि ढोलताशा पथकांचे वादन हे जणू समीकरणच बनले आहे. यात विश्वविनायक वाद्यवृंद पथकाचे बहारदार वादन पाहणे म्हणजे सोलापूरकरांसाठी अत्यंत आनंददायी अनुभव असतो.
ढोल, ताशे, भगवा ध्वज पथक, टोल या सर्वांचा अत्यंत सुंदर मिलाफ करत गणेशभक्तांना ठेका धरायला लावणारे वादन करणााऱ्या विश्वविनायक वाद्यवृंद पथकाने सोलापूरच्या सांस्कृतिक विश्वात मोलाची भर घातली आहे.
विश्व विनायक वाद्यवृंद पथकाचे प्रमुख प्रशिक्षक नागेश भोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिक तडवळकर, पृथ्वीराज पाटील, राहूल मोहोळकर, आशिष पटेल, तेजस शाह, निरज गोडबोले आदी जणांचा समूह विश्व विनायक वाद्यवृंदाचे संचालन करतो. या वाद्यवृंद पथकाने शहरात विविध ठिकाणी वादन करताना वादनाचे विविध अनोखे प्रयोगही केले आहेत. आजच्या भागात आपण विश्व विनायक वाद्यवृंद पथकाने केलेले बहारदार वादन पाहणार आहोत. महाबातमी न्यूज पोर्टलच्या वाचकांसाठी वादनाचे हे खास व्हीडीओ.
व्हीडीओ साभार ः 7AIMS