उद्या सोलापूरात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

भाविकांना मिळणार पर्वणी

उद्या सोलापूरात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

सोलापूर : प्रतिनिधी

दिवाळीनिमित्त सोलापूरकरांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बुधवार, १०  नोव्हेबर रोजी सायंकाळी ६ वाजता कुमठे प्रशालेच्या मैदानावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन-तीन महिन्यांपासून इंदुरीकर महाराजांचे  किर्तन घेण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या नियमामुळे ते शक्य झाले नाही. त्यावेळी त्यांनी दिवाळीची वेळ दिली होती. त्यानुसार १० नोव्हेबर रोजी कीर्तन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे.

परिसरातील सर्व भाविकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जयकुमार माने यांनी केले आहे.