बहुचर्चित थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या बहारदार लेझीमचा व्हिडिओ पहा !

शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती

बहुचर्चित थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या बहारदार लेझीमचा व्हिडिओ पहा !

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरची गणेशोत्सव मिरवणूक आणि थोरला मंगळवेढा तालीमचे लेझीम पथक हे जणू समीकरणच झाले आहे.

यंदाचाही मिरवणुकीत थोरला मंगळवेढा तालीम मंडळाचे लेझीमचे बहारदार डाव पाहण्यासाठी हिंदू बांधवांनी मोठी गर्दी केली होती. या मंडळाच्या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त राजेंद्र माने आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.  शिवाजी सावंत यांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तीचे पूजन करून झाले. यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा.डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.

यानंतर थोरला मंगळवेढा तालीमच्या गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी लेझीमचे बहारदार डाव सादर करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

महाबातमी न्यूज पोर्टलच्या वाचकांसाठी थोरला मंगळवेढा तालीमच्या लेझीम पथकाचा हा संपूर्ण व्हिडिओ....