नागफणीचा नंदीध्वज उचलतानाचा पहा व्हिडिओ !

होम प्रदीपनसाठी नागफणीच्या नंदीध्वजासह सर्व नंदीध्वजांची मिरवणूक सुरू

नागफणीचा नंदीध्वज उचलतानाचा पहा व्हिडिओ !

सोलापूर : प्रतिनिधी

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील होम प्रदीपन या धार्मिक विधीसाठी नागफणी बांधलेल्या नंदीध्वजासह सर्व सात नंदीध्वजांच्या मिरवणूकीस प्रारंभ झाला. युनिक हॉस्पिटलजवळील पसारे यांच्या घराजवळ पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.

सोमवारी सायंकाळी मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून नंदीध्वज मिरवणुकीने दत्त चौकात आले. पसारे यांच्या घराजवळ पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात आली तर उर्वरित नंदीध्वजांची सजावट करण्यात आली. यानंतर मिरवणुकीने सर्व नंदीध्वज होम मैदानाकडे मार्गस्थ झाले आहेत.

नागफणीचा नंदीध्वज पेलण्याचा मान सोमनाथ मेंगाणे यांच्याकडे आहे. परंपरेप्रमाणे दिवसभर उपवास करून नागफणीचा नंदीध्वज पसारे वाडा ते होम मैदानापर्यंत सोमनाथ मेंगाणे हे एकट्याने नेणार आहेत.

दुसऱ्या नंदीध्वजाला प्रभू श्रीरामांची मूर्ती असलेले बाशिंग बांधण्यात आले. या दुसऱ्या नंदीध्वजाला उचलताच भाविकांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय, जय श्रीराम चा एकच जयघोष केला.

पहिल्या नंदीध्वजाला उचलतानाचा व्हिडिओ पहा : 

हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली होती.