हिंदुत्व अन आध्यात्मिकतेचा अपूर्व संगम

शिवसेनेतर्फे श्रीरामलल्ला जल्लोष यात्रा उत्साहात

हिंदुत्व अन आध्यात्मिकतेचा अपूर्व संगम

सोलापूर : प्रतिनिधी

ढोल-ताशांचा गजर, भगवे फेटे, प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आणि जय श्रीरामचा अखंड जयघोष अशा वातावरणात श्रीरामनवमीनिमित्त शहर व जिल्हा शिवसेनेतर्फे रविवारी श्रीरामलल्ला जल्लोष यात्रा उत्साहात काढण्यात आली. हिंदुत्व अन आध्यात्मिकतेचा अपूर्व संगम या शोभायात्रेतून पहायला मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या हस्ते प्रभू श्रीराम, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर शंखनाद करून श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेस प्रारंभ झाला.

श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेत सुरुवातीला मिरवणुकीच्या अग्रभागी छत्रपती श्री शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या तिघांचे कटआऊट असलेली गाडी होती. त्यानंतर ढोल ताशा पथक होते. त्यानंतर तुतारी अन् हलगी पथकाचा कडकडाट सुरू होता. त्यामागे सजवलेली बग्गी होती. या बग्गीत प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा केलेली चिमुकली मुले बसली होती. या मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या पालखीत प्रभू श्रीरामांची अत्यंत सुरेख मूर्ती ठेवण्यात आली होती. श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेदरम्यान नागरिक या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेत होते. यामागे एका गाडीत प्रभू श्रीरामांची मूर्ती आणि त्यामागे अयोध्येतील सुरु असलेल्या श्रीराम मंदिराची प्रतिमा असलेला फलक लावण्यात आला होता.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशाच्या तालावर पदाधिकारी आणि शिवसैनिकांनीही ठेका धरत नृत्य केले. काही शिवसैनिकांनी दांडपट्टा, लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

श्री रामलल्ला जल्लोष यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी व्यापाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. नवी पेठेतील व्यापार्‍यांनी भगवे झेंडे लावून श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेचे स्वागत केले. छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकातून सुरु झालेली ही श्रीरामलल्ला जल्लोष यात्रा मेकॅनिकि चौक, पारस इस्टेट, नवी पेठमार्गे नवी पेठ राममंदिर येथे विसर्जित झाली. यावेळी सामूहिक महाआरतीने श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेचा समारोप झाला.

श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर,  माजीमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, उपजिल्हाप्रमुख दत्ता वानकर, प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, अमर पाटील, संतोष पाटील, प्रा. अजय दासरी, विष्णु कारमपुरी, नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, युवा सेनेचे विठ्ठल वानकर, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, रविकांत कांबळे, संताजीभोळे, भागवत जोगधनकर, सुरेश जगताप, लहू गायकवाड, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते रमेश व्हटकर, बापू ढगे, अक्कलकोटचे तालुका प्रमुख संजय देशमुख, उपतालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख योगीराज पाटील, धर्मराज बगले, उपशहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, रामदास मगर, बाळासाहेब माने, रेवणसिद्ध बुक्कानुरे, संजय साळुंखे, सचिन साळुंखे, सचिन गंधुरे, मोहसीन शेख, मतीन बागवान, अखिल सय्यद, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे अतुल भवर, निरंजन बोध्दुल, सचिन साळुंखे, रमण कुलकर्णी, सिद्धाराम खजूरगी, अनिल दंडगुले, महेश ठाकरे, जयंत कदम, दत्ता खलाटे, रेवण पुराणिक, बालाजी चौगुले, राहुल गंधुरे, देवा विटकर, देविदास कोळी, सुनील भोसले, राज पांढरे, रविकांत गायकवाड, सुशील कन्नुरे, बसवराज जमखंडी आदी उपस्थित होते.
--------------------------------------
शिवसेनाप्रमुखांच्या फलकाने वेधून घेतले लक्ष
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा असलेला फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. त्यावर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा संदेश देण्यात आला होता.
------------
भगवे वातावरण
श्रीरामलल्ला जल्लोष यात्रेस शिवसेनेच्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. भगवे ध्वज,  भगवे फेटे, भगव्या टोप्या, गुलालाची मुक्त उधळण आणि जय श्रीराम, जय भवानी जय शिवराय अशा घोषणांमुळे वातावरण भगवे बनले होते.
---------------------------
चिमुकले बनले राम, लक्ष्मण, जानकी
रोहन सिद्धाराम खजुरगीने प्रभू रामचंद्र, रत्नकला मल्लिकार्जुन नागठाण हिने सीतामाता, सिद्धारुढ अनिल नागठाण याने लक्ष्मण तर सिद्धाराम ईरण्णा हिप्परगी याने हनुमानजींची वेशभूषा केली होती.
-------------------------