प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी ! शेर शिवराज चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

22 एप्रिल रोजी होणार प्रदर्शित : प्रेक्षकांची संपणार उत्सुकता

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी ! शेर शिवराज चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सोलापूर : प्रतिनिधी

द कश्मीर फाइल्स नंतर ज्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती त्या शेर शिवराज चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या 22 एप्रिल रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'श्री शिवराज अष्टक' या आठ चित्रपटांच्या मालिकेमधील हा चौथा चित्रपट आहे. यापूर्वी फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड हे तीन सुपरहिट चित्रपट या टीमने प्रेक्षकांना दिले आहेत.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. पूर्वीच्या तीनही चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी साकारली आहे. तर अफझल खानाची भूमिका कोण करणार याचीही उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. ती उत्कंठाही संपली असून बॉलिवूडमधील दमदार अभिनेते मुकेश ऋषी हे अफजलखानाच्या वेषात पहायला मिळणार आहेत.

याशिवाय राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिसणार आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनीही या चित्रपटात खास भूमिका साकारली आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेते अजय पूरकर, वर्षा उसगावकर, अलका कुबल, मृण्मयी देशपांडे, समीर धर्माधिकारी, रवींद्र मंकणी, वैभव मांगले, सचिन देशपांडे, आस्ताद काळे, सुश्रुत मंकणी, ऋषी सक्सेना, विक्रम गायकवाड, अक्षय वाघमारे, ज्ञानेश वाडेकर, संग्राम साळवी, अनिकेत बांदल, दिप्ती केतकर, माधवी नेमकर, ईशा केसकर, दिप्ती धोत्रे, चंद्रशेखर कुलकर्णी, सुनील जाधव, सचिन भिलारे, निखिल लांजेकर, सुहास भोळे, बिपिन सुर्वे, ललित सावंत, रोहन मंकणी, सक्षम नायडू, कुणाल धुमाळ, मंदार परळीकर, आनंद देशपांडे, प्रसाद सुर्वे, अनिमेष कोसंबी, अन्वय बेंद्रे, राहुल बोडस, प्रविण दिघे, आयान करणे आदी या चित्रपटाचा महत्वाचा भाग आहेत.

२२ एप्रिल रोजी सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांमधून याच चित्रपटाची मोठी चर्चा पहायला मिळते आहे.
--------------
अप्रतिम संगीताची पुन्हा एकदा मेजवानी
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीनही चित्रपटात अतिशय उच्च दर्जाचे संगीत देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या संगीत टीमने 'शेर शिवराज' या चित्रपटासाठीही संगीत दिले आहे. संगीतकार देवदत्त बाजी आणि टीमने साकारलेली गीते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-----------------
सोलापूरचे दोन कलाकार
या चित्रपटात सोलापूरचे ॲड. आनंद देशपांडे यांनी भूमिका साकारली असून तालवाद्य वादक नागेश भोसेकर यांनी या चित्रपटाच्या गीतांसाठी तालवाद्यांचे वादन केले आहे.

--------------

'शेर शिवराज' चित्रपटाचा ट्रेलर खास 'महाबातमी न्यूज पोर्टल' च्या वाचकांसाठी... पहा व्हिडीओ