टायटन आय वेअर शोरूमचा रविवारी शुभारंभ

दर्जेदार चष्मे, गॉगल खरेदीची संधी

टायटन आय वेअर शोरूमचा रविवारी शुभारंभ

सोलापूर : प्रतिनिधी

ब्रॅन्डेड कंपन्यांचे चष्मा, गॉगल खरेदी करण्यासाठी आता पुण्या-मुंबईला जाण्याची गरज नाही. आता टायटन आय वेअर या कंपनीचे शोरूम सोलापूरमध्ये पार्क चौक येथे सुरू होणार आहे, अशी माहिती चष्माघरचे चालक श्रीनिवास गाली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी (ता. २०) डिसेंबर रोजी दु. ४ वा. कंपनीचे एरिया मॅनेंजर दिलीप धावडे, पुणे विभागाचे व्यवस्थापक अपूर्व दराडे, मार्केटिंग प्रमुख स्वरूप भोसले, सहाय्यक व्यवस्थापक महेश चिंचोळकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अर्चना चष्माघरला टायटन आयवेअर शोरूम सुरू करण्याचा मान मिळाला आहे. सन १९९३ पासून विविध प्रकारचे चष्मे, गॉगल विक्री करण्याचा व्यवसाय श्रीनिवास व्यंकटेश गाली, हरिकृष्णा गाली, हरिदास गाली, विवेक गाली, गणेश गाली करीत आहेत. अवघ्या ५०० फुटाच्या घरात आई वडील आणि ५ भावंडे राहात होतो. महाराष्ट्र ऑप्टिशियन्स या अनिल दावडा यांच्या दुकानात काम करून घर चालायचे. त्यानंतर अनिल दावडा यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने दाजी पेठेत स्वत:चा चष्मा विक्रीच्या अर्चना ऑप्टिशियन्स या दुकानाचा शुभारंभ केला. त्यानंतर साखरपेठेत अर्चना आय वर्ल्ड नावाची दुसरी शाखा सुरू झाली त्यानंतर तिसरी शाखा पार्क चौकात अर्चना चष्माघर नावाने सुरू झाली. सन २०१३ मध्ये चौथी शाखा सुरू झाली त्यानंतर सन २०१९ मध्ये आणखी एक चष्मा विक्रीचे दुकान सुरू करून अवघ्या काही वर्षात सोलापूर शहरात ५ शाखा सुरू करण्यात यश आले. 

लोकांचा विश्वास आणि दर्जेदार चष्मे, गॉगल देण्याची परंपरा आजही कायम आहे. व्यवसाय करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न करण्यात येतो त्यामध्ये गरीब आणि गरजूंना मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, कोरोनाच्या महामारीत मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले. व्यवसायातून सेवा करण्याची परंपरा सांभाळून आता नव्याने सोलापूर शहरात टायटन आयवेअर हे नवे शोरूम सोलापूरकरांच्या सेवेत सुरू करीत आहोत. या माध्यमातून विविध कंपन्यांचे बँ्रन्डेड चष्मे, गॉगल, फ्रेम आणि लेन्स त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी आणि शास्त्रोक्त चष्मे तसेच फास्टट्रॅक कंपनीचे गॉगल, फ्रेम, परफ्युम, डिओ,उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आजपर्यत लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसाच यापुढेही प्रतिसाद मिळेल अशीच अपेक्षा आहे.

या पत्रकार परिषदेला हरिकृष्णा गाली,हरिदास गाली, विवेक गाली, गणेश गाली उपस्थित होते. 

(वाणिज्य वार्ता)