साडी खरेदी करा आणि मिळवा नवाकोरा स्मार्टफोन

कुठे मिळणार साडी खरेदीवर ७० टक्के सूट ? वाचा !

साडी खरेदी करा आणि मिळवा नवाकोरा स्मार्टफोन

सोलापूर : प्रतिनिधी

तब्बल तीन पिढ्यांपासून ग्राहक जोडलेल्या आणि चार पिढ्यांपासून साडी व्यवसायात लोकप्रिय असलेल्या धूत सारीजने यावर्षीही २१ जूनपासून साडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात नव्या साड्यांचा प्रचंड मोठा साठा विक्रीसाठी उपलब्ध असून यावर तब्बल ३० ते ७० टक्क्यांपर्यंत सूटही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विशिष्ट रकमेच्या साडी खरेदीवर स्मार्टफोनसह हमखास बक्षिसांची लयलूटही राहणार आहे, अशी माहिती धूत सारीजचे पुरुषोत्तम धूत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाच्या साडी महोत्सवात साडी खरेदीवर ग्राहकांवर बक्षीसांची लयलूट करण्यात येणार आहे. यात विशिष्ट रकमेच्या खरेदीवर चक्क मोबाईलसह ट्रॉली बॅग, इस्त्री, तवा, वेडिंग सेट, गालीचा, कुकर, हॉट पॉट अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सिल्क साड्यांसह सर्व प्रकारच्या साड्यांच्या खरेदीसाठी धूत सारीजलाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळे ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी धूत सारीजतर्फे दरवर्षी साडी महोत्सवाचे आयोजन केले जाते, असेही श्री. धूत यांनी सांगितले.

दरवर्षी ग्राहक धूत साडी महोत्सवाची आवर्जून वाट पाहतात. आणि साडी महोत्सवात लग्न, सण, वास्तुशांती तसेच इतर अनेक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. यंदाच्यावर्षी २१ जून या योग दिनाचे औचित्य साधून हा साडी महोत्सव होत आहे. या साडी महोत्सवात जुन्या साड्या विक्रीस ठेवण्यात येणार नसून नव्या फ्रेश साड्यांचा स्टॉक उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुगा सिल्क, मैसूर सिल्क, बनारसी, धर्मावरम, मदुराई, बेंगलोरी, दिंडीगल, बांधणी, कसवू, कांजीवरम, कलमकारी, कांथा, पोचमपल्ली, टसर सिल्क अशा शेकडो प्रकारच्या साड्यांचा प्रचंड मोठा खजिनाच महिला भगिनींसाठी धूत साडी महोत्सवात खुला करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या चारही राज्यातील ग्राहक साडी खरेदीसाठी तसेच लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी धूत सारीजमध्ये येण्यालाच प्राधान्य देतात. इतर साड्यांबरोबरच येथील विशेषतः सिल्क साड्यांना प्रचंड मागणी आहे. सिल्क साड्यांचे महाराष्ट्रातील हे एक्सक्लुझिव्ह एकमेव शोरूम आहे. लोकमतसारख्या अनेक नामवंत संस्थांनी धूत सारीजला गौरविले आहे.

डिझायनर ब्रायडल शालू, वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रायडल कंची व पैठणी, ब्रँडेड सिंथेटिक साड्या व संपूर्ण लग्नाच्या बस्त्यासाठी ग्राहकांनी धूत साडी महोत्सवास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन पुरुषोत्तम धूत यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस धूत सारीजचे राजगोपाल धूत, नवीन चारगोंडे उपस्थित होते.
------------
साडी महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी 

धूत साडी महोत्सवाचे उद्घाटन बुधवार २१ जून रोजी सायं. ५ वाजता प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पोलिस उपायुक्त दीपाली काळे, अनिता चव्हाण, गीता शिंदे, विशाखा तासगावकर, सोनल पांचाल, शर्मिला जंगे, नम्रता चाकोते, वैशाली सुरवसे, अस्मिता गायकवाड, सुवर्णा झाडे, संगीता जोगधनकर, श्रद्धा कामत - पटेल, पल्लवी गंभीरे - नाईक, आकांक्षा गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. अशा सेलिब्रिटींसोबत महिला भगिनींना साडी खरेदीची, लग्नाचा बस्ता बांधण्याची पर्वणी धूत बंधूंनी उपलब्ध करून दिली आहे.
-------------
...म्हणून 'धूत सारीज' मध्ये मिळते स्वस्तात उत्तम साडी

'धूत सारीज' तर्फे कारखानदारांना स्वतः रेशीम पुरवून साड्या बनवून घेण्यात येतात. याशिवाय धूत सारीजकडे स्वतःचे अतिशय कल्पक आणि आकर्षक नक्षीकाम करणारे डिझायनर आहेत. त्यामुळे धूत सारीजमध्ये अतिशय स्वस्त दरात ग्राहकांना अत्युच्च दर्जाच्या आणि नक्षीकामाच्या साड्या अतिशय अल्प दरात उपलब्ध होतात. परिणामी, अनेक दूरचित्रवाणीच्या मालिकांमधील, चित्रपटांतील कलाकार, राजकीय नेते साडी खरेदीसाठी धूत सारीजलाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे, असे पुरुषोत्तम धूत यांनी यावेळी सांगितले.