ड्रग्स प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'अँक्शन मोड' मध्ये !
"कोणालाच नाही सोडणार..." पहा व्हिडीओ !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'अँक्शन मोड' मध्ये आले आहेत. ड्रग्स प्रकरणी जे जे दोषी असतील त्यांची चौकशी करणार असून यात कोणालाच सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता ड्रग्स प्रकरणात भविष्यात कठोर कारवाई होण्याची शक्यता दिसून येत आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रग्स फ्री महाराष्ट्र संकल्पना घेऊन जी परिषद झाली तेव्हा सगळ्यांना सांगण्यात आले होते की हा उपक्रम घ्या. त्यामुळे याबाबत सगळे युनिट्स कामाला लागले आहेत.
मुंबई पोलिसांनादेखील नाशिकची माहिती मिळाली आणि त्यांनी धाड टाकली. ललित पाटील हातामध्ये आला आहे. आता यातील मोठे जाळे बाहेर येईल. यातून एक मोठा नेक्सस आता समोर आला आहे. लवकरच याबाबत मी अधिक माहिती देईन असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण आपण गांभीर्याने घेतल्याचे सूचित केले आहे.
--------
अनेकांची तोंडे होतील बंद
ललित पाटील प्रकरणाच्या सखोल चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येतील. आणि त्यामुळे अनेकांची तोंडे बंद होणार असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.