आषाढी एकादशीदिनी सोलापूरकरांना संधी भजनाच्या आनंदाची
'अमृताची फळे' कार्यक्रमाचे आयोजन : कुठे होणार ? वाचा
सोलापूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अवघा महाराष्ट्र भजनात दंग झालेला असताना सोलापूरकर कसे मागे राहतील ? आषाढी एकादशीच्या दिवशी सोलापूरात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक दीपक कलढोणे यांचा 'अमृताची फळे' हा अभंग गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरूवार, २९ जुन रोजी सायं. ५.३० वाजता सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. गायन व श्रवणभक्तीच्या वारीचे म्हणजेच या कार्यक्रमाचे यंदाचे १७ वे वर्ष आहे.
गायक दीपक कलढोणे हे दरवर्षी आषाढी एकादशीला सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याच्या उद्देशाने संतांनी निर्मिलेल्या साहित्य प्रचारार्थ
प्रतिवर्षी अभंगगायनाचा सेवाभावी उपक्रम घेत आहेत. यामुळे आषाढी एकादशीदिवशी नवविधाभक्तीतील श्रवणभक्तीचे वातावरण सोलापुरात निर्माण होत आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांचे असून साथसंगत जयंत जोशी, प्रसाद कुलकर्णी, देवेंद्र अयाचित करत आहेत.
महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजय वाघ, सो.म.पा. चे माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवा बाटलीवाला, उद्योजक महावीर गुंडाळे, गिरीश माळवदे, संजय अजनसोंडकर, डॉ. सुरेश व्यवहारे, डॉ. नयना व्यवहारे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या श्रवणभक्तिसोहळ्यात सोलापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन 'दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्ट,' सोलापूरच्यावतीने करण्यात आले आहे.