विकासात्मक विजयपूर रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचे काम प्रगतिपथावर
१५ ऑक्टोबरपर्यंत होणार पूर्ण
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेकडून विजयपूर रस्त्यावर सुरू असलेले ड्रेनेज लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली.
सोलापूर शहरातील अनेक नगरांतील ड्रेनेजचे पाणी धर्मवीर संभाजी महाराज तलाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून मिसळत आहे. हे पाणी देगावकडे सोडण्यासाठी ही पाईपलाईन टाकण्यात येत आहे.
होटगी रस्ता, पोस्टल कॉलनीकडून येणारे ड्रेनेजचे पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईनचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. आता रेल्वे पूलाच्या एकबाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ५० मीटरचा पाईप टाकण्यात येत आहे.
या पाईपचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजू जोडण्यात येणार आहेत. दररोज सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत हे काम सुरू आहे.